Velvet Tops : फॅशन विश्वात ‘वेलवेट टॉप्स’ची धूम! कॉलेज असो वा ऑफिस, ‘मखमली पोत’ देईल तुम्हाला क्लासी आणि रॉयल लूक

spot_img

कधीच आऊट ऑफ ट्रेंड न होणाऱ्या फॅब्रिकचे ५ भन्नाट प्रकार; जाणून घ्या स्टाईल करण्याच्या सोप्या टिप्स

कॉलेज किंवा ऑफिसला जाताना प्रत्येक महिलेला आपण इतरांपेक्षा वेगळे, स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसावे असे वाटत असते. यासाठी बाजारात येणारे नवनवीन ट्रेड्स फॉलोड केले जातात. सध्या अशाच एका फॅब्रिकची फॅशन जगतात कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे, ते फॅब्रिक म्हणजे ‘वेलवेट’ (Velvet). वेलवेट हा एक असा मखमली पोत असलेला कापडाचा प्रकार आहे, जो कधीच आऊट ऑफ ट्रेंड होत नाही. त्याचा रॉयल लूक अगदी साध्या आउटफिटलाही थेट क्लासिक आणि महागडा लूक देतो. पूर्वी हे कापड केवळ भारी साड्या किंवा हेवी लेहेंग्यापुरतेच मर्यादित असायचे. मात्र, आताच्या मॉडर्न फॅशन युगात मुलींमध्ये वेगवेगळ्या डिझाइन्सच्या ‘वेलवेट टॉप्स’ची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे.

वेलवेट टॉप्सचे ५ ट्रेंडी आणि स्टायलिश पॅटर्न*

जर तुम्हालाही तुमच्या वॉर्डरोबमध्ये काहीतरी नवीन आणि क्लासी अ‍ॅड करायचे असेल, तर वेलवेट टॉप्सचे हे प्रकार नक्की ट्राय करा:

  • १. व्ही-नेक टॉप (V-Neck Top):

सध्या कॉर्पोरेट मीटिंग्ज किंवा ऑफिस पार्ट्यांसाठी हा प्रकार सर्वाधिक पसंतीस उतरत आहे. हा टॉप तुम्ही फॉर्मल पेन्सिल स्कर्ट किंवा जीन्ससोबत मॅच करून एक परफेक्ट आणि बोल्ड लुक मिळवू शकता.

  • २. इंडो-वेस्टर्न क्रॉप टॉप (Crop Top):

वेलवेटचा क्रॉप टॉप हाय-वेस्ट जीन्स, शरारा किंवा लेहेंग्यावर जॅकेटसोबत परिधान केल्यास अतिशय अप्रतिम दिसतो. एथनिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या लूकसाठी हा एक उत्तम फ्युजन पर्याय आहे.

  • ३. एम्ब्रोइडरी टॉप (Embroidery Top): तुम्हाला जर सण-समारंभासाठी किंवा एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी पारंपरिक लूक हवा असेल, तर वेलवेटवर सुंदर एम्ब्रोइडरी (भरतकाम) केलेले टॉप्स प्लाझो किंवा सिगारेट पँटसोबत उत्तम दिसतात.
  • ४. विंटेज पफ स्लीव्ह्ज टॉप (Puff Sleeves Top):

जर तुम्हाला ९० च्या दशकातील विंटेज आणि रेट्रो लूकची आवड असेल, तर फुग्याचे हात (पफ स्लीव्ह्ज) असलेला वेलवेट टॉप निवडा. हा टॉप प्लेन किंवा स्किनी जीन्सवर अतिशय स्टायलिश लूक देतो.

  • ५. कॅज्युअल फ्रंट नॉट टॉप (Front Knot Top):

पुढच्या बाजूला गाठ मारण्याची फॅशन (टाय-अप डिझाईन) सध्या खूप ट्रेंडी आहे. कॉलेज कट्ट्यावर किंवा मित्रांसोबत बाहेर फिरताना कॅज्युअल पण कुल लूकसाठी हा टॉप बेस्ट आहे.

वेलवेट फॅब्रिकचा स्वतःचा एक वेगळाच ग्लो आणि शाईन असते. त्यामुळे हा टॉप परिधान करताना त्यावर खूप जास्त किंवा हेवी ज्वेलरी घालणे टाळावे. एखादे साधे स्टड इअररिंग किंवा नाजूक चेनसुद्धा या आउटफिटवर तुम्हाला एलिगंट लूक मिळवून देण्यास पुरेशी ठरेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ