Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलात फेरबदलांची मालिका सुरूच; अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

spot_img

महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाकडून पोलीस दलातील बदल्यांचा सिलसिला सलग चौथ्या दिवशीही कायम ठेवण्यात आला आहे. 15 मे रोजी 53 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जाहीर झाल्यानंतर आता पुन्हा अनेक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या सततच्या फेरबदलांमुळे राज्यातील पोलीस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे.

नवीन आदेशांनुसार, मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असलेले नवनाथ धवळे यांची मुंबई गुन्हे शाखेच्या शोध पथक-1 चे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्याकडे अमली पदार्थ विरोधी पथकाचा अतिरिक्त कार्यभारही कायम राहणार आहे. तसेच सायबर गुन्हे शाखेतील पुरुषोत्तम कराड यांना उत्तर विभाग-1 चे नवे DCP म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, नवी मुंबई विभाग-1 चे पोलीस उपायुक्त पंकज दहाणे यांची विशेष कृती दलात बदली करण्यात आली आहे. अमरावती शहरातील पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची मुंबईत पूर्व विभाग-2 मध्ये नियुक्ती करण्यात आली असून, मुंबई गुन्हे शाखेतील DCP विशाल ठाकूर यांची नवी मुंबईत बदली करण्यात आली आहे. यासोबतच पश्चिम नियंत्रण कक्षात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक शीतल दयानंद भालेकर यांना पदोन्नती देत पोलीस निरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. पदोन्नतीनंतरही त्या पश्चिम नियंत्रण कक्षातच कार्यरत राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ