Health Tips : उंचीनुसार किती असावं योग्य वजन? जाणून घ्या BMI आणि फिटनेसचा महत्त्वाचा संबंध

spot_img

अनेक लोक दररोज वजन तपासत असतात आणि वजनात थोडाही बदल झाला तरी चिंता व्यक्त करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, केवळ वजन किती आहे यावरून आरोग्याचा अंदाज लावता येत नाही. व्यक्तीच्या उंचीनुसार वजन योग्य प्रमाणात आहे का, हे अधिक महत्त्वाचे मानले जाते. यासाठी डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्सचा आधार घेतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचं वजन 60 किलो असलं तरी तिची उंची कमी असल्यास ते वजन जास्त मानलं जाऊ शकतं, तर उंच व्यक्तीसाठी ते सामान्य असू शकतं.

तज्ज्ञांच्या मते, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी उंचीनुसार वजनाचे काही अंदाजे मापदंड निश्चित करण्यात आले आहेत. मात्र शरीररचना, स्नायूंचं प्रमाण आणि जीवनशैलीनुसार त्यात बदल होऊ शकतो. उंचीच्या तुलनेत वजन जास्त असल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी आणि कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका वाढतो. तर खूप कमी वजन असल्यास अशक्तपणा, पोषणतत्त्वांची कमतरता आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

याशिवाय, फक्त वजन योग्य असणं पुरेसं नसून पोटावर साचणारी अतिरिक्त चरबीही आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पोटाचा घेर नियंत्रणात ठेवणंही गरजेचं आहे. योग्य वजन टिकवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, भरपूर पाणी आणि तणावमुक्त जीवनशैली आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. तसेच प्रत्येकाची शारीरिक रचना वेगळी असल्याने इंटरनेटवरील माहितीवर पूर्णपणे अवलंबून न राहता डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं अधिक योग्य ठरतं.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ