Mumbai : वांद्रे पूर्वेत अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई; नागरिकांमध्ये संताप

spot_img

मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाजवळील अतिक्रमण हटवण्याची मोहीम मंगळवारी सकाळपासून जोरात सुरू करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर रेल्वे प्रशासनाने गरीब नगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली असून, या मोहिमेसाठी सहा बुलडोझर आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या घरांवर आणि इतर बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात येत असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कारवाईदरम्यान अनेक स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वर्षानुवर्षे येथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना अचानक घर खाली करण्याची वेळ आल्याने अनेकांनी आक्रोश केला. नागरिकांच्या मते, या कारवाईमुळे त्यांच्यासमोर राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत ही मोहीम आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ