NEET २०२६ : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणाचे नाशिक कनेक्शन; पोलिसांच्या कारवाईत एक जण ताब्यात

spot_img

देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET 2026 परीक्षा रद्द झाल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असताना या संपूर्ण घडामोडींचे नाशिक कनेक्शन समोर आले असून, राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

३ मे रोजी देशभरात पार पडलेल्या नीट परीक्षेला तब्बल २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. मात्र परीक्षा होण्याच्या जवळपास ४८ तास आधीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने याचा तपास CBI कडे सोपवला आहे. प्राथमिक चौकशीत काही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी परीक्षा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. आता नव्याने परीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र तारीख जाहीर केली जाणार आहे. मात्र सध्या नव्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, राजस्थानमध्ये उघडकीस आलेल्या पेपरफुटी रॅकेटचा तपास करताना काही धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार राजस्थान पोलिसांनी नाशिक पोलिसांची मदत घेत कारवाई केली आणि एका संशयिताला ताब्यात घेतले. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, पेपर नेमका कसा लीक झाला आणि त्यामागे कोणते जाळे कार्यरत होते, याचा तपास आता अधिक वेगाने केला जाणार आहे.

या संपूर्ण घटनेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले असून, पालकांमध्येही मोठी चिंता निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ