Jalgaon Gold Price : जळगावात सोनं-चांदी पुन्हा महागलं; सोन्यात जवळपास ३ हजारांची तर चांदीत ७ हजारांची वाढ

spot_img

जळगावच्या सराफ बाजारात अवघ्या २४ तासांत सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये पुन्हा चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत दर घसरल्यामुळे खरेदीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते, मात्र आता अचानक झालेल्या वाढीमुळे बाजारातील चित्र बदलले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात सुमारे ३ हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीदेखील तब्बल ७ हजार रुपयांनी महागली आहे. गेल्या महिनाभरात सातत्याने घसरण झाल्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे अनेकांनी लग्नसराईच्या खरेदीची तयारीही सुरू केली होती. मात्र नव्या दरवाढीमुळे दागिने खरेदी करणाऱ्यांना आता अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागू शकतो.

सराफ व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलरमधील चढ-उतार आणि वाढती मागणी यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये अचानक वाढ झाली आहे. आगामी काही दिवसांत दर आणखी वाढणार की स्थिर राहणार, याकडे ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ