Mumbai Fish Market Controversy : “मटण-चिकनसाठी वेगळा नियम का?” शिवसेना ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांना तिखट सवाल

spot_img

मुंबईतील मासळी बाजारांमध्ये मासे कापून विकण्यावर महानगरपालिकेने घातलेल्या कथित निर्बंधांमुळे आता प्रशासन आणि कोळी समाज यांच्यात मोठा संघर्ष उभा ठाकला असून, या वादात शिवसेना ठाकरे गटाने उडी घेतली आहे. अस्वच्छतेचे कारण पुढे करत पालिकेने कोळी महिलांना मासे कापण्यास मनाई केली असून, नियम मोडल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करत शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“मुंबईचे मूळ रहिवासी असलेले कोळी बांधव वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने मासे विकत आले आहेत, त्याच पद्धतीने विकतील; तुमच्यात हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा,” असे खुले आव्हान चित्रे यांनी दिले आहे. अस्वच्छतेचा हा नियम फक्त माशांसाठीच का? असा सवाल करत, “चिकन घेताना जिवंत कोंबडी आणि मटण घेताना जिवंत बकरा घरी न्यायचा का?” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. कोळीवाड्यांच्या जमिनी बळकावण्यासाठीच कोळी बांधवांना त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप करत, आगामी काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ