Marathi Actress Manasi Salvi : मानसी साळवीने अचानक सोडली हिंदी मालिका; निर्मात्यांकडून कायदेशीर कारवाईचा इशारा

spot_img

‘असंभव’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मानसी साळवी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. हिंदी मालिकांमध्ये सक्रिय असलेल्या मानसीने ‘महादेव अँड सन्स’ ही मालिका अचानक सोडल्याने प्रेक्षकांसह निर्मात्यांनाही धक्का बसला आहे. या मालिकेत ती ‘भानू वाजपेयी’ हे प्रभावी नकारात्मक पात्र साकारत होती आणि तिच्या अभिनयाला चांगली दाद मिळत होती.

मात्र, कोणतीही स्पष्ट कारणे न देता मानसीने शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत तिने अद्याप सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, या मालिकेचे निर्माते सौरभ तिवारी यांनी या प्रकरणावर भाष्य करत काही महत्त्वाचे मुद्दे समोर ठेवले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, कामाच्या दिवसांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे अभिनेत्री नाराज होती. मात्र, डेली सोपमध्ये शूटिंगचे वेळापत्रक बदलणे ही सामान्य बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निर्मात्यांनी सांगितले की, मानसीने 20 एप्रिल रोजी ईमेलद्वारे शो सोडण्याचा निर्णय कळवला आणि 15 मे हा शेवटचा शूटिंग दिवस असेल असे नमूद केले. मात्र, त्यांच्या मते हा निर्णय एकतर्फी असून कराराच्या अटींचे उल्लंघन करणारा आहे. यापुढे निर्मात्यांनी कठोर भूमिका घेत, करारानुसार किमान सहा महिन्यांची नोटीस देणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच, शो सोडण्याचा निर्णय हा परस्पर संमतीनेच घ्यावा लागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व घडामोडींमुळे निर्माते नाराज असून, करारभंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात चर्चा रंगली असून, पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ