Vinod Kambli, MI vs SRH : प्रकृती ठीक नसतानाही विनोद कांबळींनी गाठले मैदान

spot_img

मुंबईचा पराभव झाला तरी कांबळींच्या हजेरीने चाहते झाले भावूक; हैदराबादचा थरारक विजय

आयपीएल २०२६ च्या ४१ व्या सामन्यात काल वानखेडे स्टेडियमवर धावांची अक्षरशः आतषबाजी पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील या हाय-स्कोअरिंग लढतीत २ राजकीय मुद्द्यांपेक्षाही एका खास पाहुण्याची चर्चा अधिक रंगली. भारताचा माजी स्फोटक फलंदाज विनोद कांबळी प्रकृती अस्वास्थ्य असतानाही हा सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचला होता. दोन व्यक्तींच्या आधाराने चालणाऱ्या कांबळींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, आपल्या लाडक्या खेळाडूला या अवस्थेत पाहून चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी ‘गेट वेल सून’च्या शुभेच्छा दिल्या.

मैदानावरील लढतीबद्दल बोलायचे झाले तर, रायन रिकल्टनच्या शानदार शतकाच्या जोरावर मुंबईने २४३ धावांचा हिमालय उभा केला होता. मात्र, सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी हा डोंगराएवढा धावसंख्याही खुजी ठरवली. हैदराबादने अवघ्या १९ षटकांत २४४ धावांचे लक्ष्य गाठत मुंबईवर ६ गडी राखून मात केली. गेल्या काही काळापासून ब्रेन स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या कांबळींनी आर्थिक आणि शारीरिक अडचणींवर मात करत क्रिकेटवरील प्रेमापोटी हजेरी लावली, हीच या सामन्यातील सर्वात मोठी आणि हृदयस्पर्शी घटना ठरली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ