Shiv Thakare : ‘मराठी माणूस थांबता कामा नये’…टॅक्सी चालकांचा संप, शिव ठाकरेकडून मदतीचा हात.

spot_img

राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात या मुद्द्यावर मोठी चर्चा रंगली आहे. परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याच्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असले, तरी अमराठी चालकांकडून त्याला तीव्र विरोध दर्शवला जात आहे. या पार्श्वभूमीवर विविध चालक संघटनांनी ४ मेपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या निर्णयाला काही मराठी कलाकारांनी खुलेपणाने पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेता शिव ठाकरेने यामध्ये पुढाकार घेत सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी एक वेगळीच घोषणा केली आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत, संपाच्या दिवशी लोकांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

शिव ठाकरेने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, ४ मे रोजी जर कुठे त्याची गाडी दिसली, तर नागरिकांनी ती निर्धास्तपणे थांबवावी. त्याने आपल्या गाडीचा क्रमांक आणि मॉडेलही जाहीर केले असून, “जय महाराष्ट्र” अशी ओळख गाडीवर असेल, असेही सांगितले आहे. तसेच, गाडी चालवणारा व्यक्ती भगवा फेटा घातलेला असेल आणि तो लोकांच्या सेवेसाठी तत्पर असेल, असेही त्याने स्पष्ट केले.

“मराठी माणूस अडखळता कामा नये” असा संदेश देत शिव ठाकरेने नागरिकांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या उपक्रमाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, अनेकांनी त्याच्या संवेदनशीलतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे अभिनंदन केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ