Shefali Bagga : क्रिकेटर चहलसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर शेफाली बग्गाचं मोठं विधान

spot_img

अनुष्का-विराटच्या केमिस्ट्रीवर फिदा झाली ‘बिग बॉस’ फेम सुंदरी

भारतीय क्रिकेटचा ‘किंग’ विराट कोहली केवळ मैदानावरील आपल्या बॅटिंगसाठीच नाही, तर मैदानाबाहेर पत्नी अनुष्का शर्मावर असलेल्या अपार प्रेमासाठीही ओळखला जातो. विराट परदेशात असला तरी त्याच्या आणि अनुष्काच्या केमिस्ट्रीची चर्चा सतत रंगत असते. नुकतेच हे जोडपे प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला गेले असता त्यांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. मैदानात कितीही तणाव असला तरी अनुष्काकडे बघून ‘जेवलीस का?’ असा प्रेमाचा इशारा करणाऱ्या विराटची हीच ‘केअरिंग’ स्टाईल आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीला भावली आहे. ‘बिग बॉस १३’ मधील स्पर्धक आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर शेफाली बग्गा हिने थेट विराट कोहलीसारखा पती हवा असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेफाली बग्गाचे नाव फिरकीपटू युजवेंद्र चहलसोबत जोडले जात आहे. या अफवांवर भाष्य करताना शेफालीने स्पष्ट केले की, लोकांचे विचार खूप संकुचित आहेत. “आम्ही फक्त जेवायला एकत्र गेलो तर लोकांनी आम्हाला डेटिंगच्या अफवांमध्ये अडकवले,” असे म्हणत तिने या चर्चा फेटाळून लावल्या. मात्र, जेव्हा तिला तिच्या ड्रीम पार्टनरबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने विराट कोहलीचे उदाहरण दिले. “मला असा जोडीदार हवा आहे जो खूप काळजी घेणारा, इमोशनल आणि पूर्णपणे आपल्या पत्नीशी निष्ठावान असेल. विराट कोहली कितीही बिझी असला तरी तो अनुष्काची ज्या प्रकारे काळजी घेतो, ते पाहून त्यांच्यातील प्रेम लगेच जाणवते,” असे शेफाली म्हणाली. शिखर धवनच्या लग्नात धमाल उडवून देणारी शेफाली आता तिच्या या ‘विराट’ इच्छेमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ