spot_img

Rupali Thombre Patil : अशोक खरात प्रकरणात नवे आरोप; रुपाली चाकणकरांवर कारवाईची मागणी

spot_img

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे होत असून, आता या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. महिलांना “दैवी आशीर्वाद” देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत अत्यंत अश्लील कृत्ये केल्याचा आरोप खरातवर आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर थेट आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, चाकणकर यांना या प्रकरणाची पूर्ण माहिती असूनही त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि खरातला संरक्षण दिले. त्यामुळे त्यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानून तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ठोंबरे पाटील यांनी असेही सांगितले की, ‘खबरदार पुढारी’ या वृत्तपत्राने सुमारे वर्षभरापूर्वीच खरातचा भंडाफोड केला होता. त्या वेळी संबंधित पत्रकाराला धमक्या देण्यात आल्या आणि त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, खरातकडे असलेल्या व्हिडिओंच्या आधारे काही युवकांनी त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे. हे युवक काही महिन्यांपूर्वी पुण्यातील एका सामाजिक कार्यकर्तीला भेटले होते. त्या कार्यकर्तीने स्वतःला ‘गुरुमाऊली’ मानणाऱ्या बाबाला भेटून काही प्रकारे तडजोड घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, ती कार्यकर्ती नेमकी कोण आहे, हे तपासातून स्पष्ट होणार असल्याचेही ठोंबरे पाटील यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ