spot_img

MS Dhoni IPL 2026 : थालाच्या हातातली ‘ती’ बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली?

spot_img

धोनीचा व्हिडिओ पाहून प्रतिस्पर्धी संघात धडकी!

जगभरातील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) २८ मार्चपासून सुरू होत आहे. यंदाचा हंगाम अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे, कारण या हंगामात मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. हंगामाचा सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार असून, चाहत्यांच्या नजरा मात्र चेन्नई सुपर किंग्स (CSK) वर खिळल्या आहेत. विशेष म्हणजे, यंदा संजू सॅमसन चेन्नईच्या ‘पिवळ्या जर्सी’त दिसणार आहे, तर बऱ्याच काळापासून चेन्नईची ओळख असलेला रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सकडून मैदानात उतरेल.

धोनीचा शेवटचा हंगाम? ‘मास्टर ऑफ क्राफ्ट’चा व्हिडिओ व्हायरल

सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे ‘थाला’ एमएस धोनीच्या निवृत्तीची. हा धोनीचा आयपीएलमधील शेवटचा हंगाम असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्सने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये धोनी स्वतः ग्राइंडरने आपली बॅट नीट करताना दिसत आहे. “मास्टर ऑफ द क्राफ्ट” असं कॅप्शन असलेला हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडत असून, धोनी पुन्हा एकदा मैदानावर षटकारांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत.

इरफान पठाणचा मोठा दावा: कर्णधार घडवण्याची जबाबदारी

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याच्या मते, धोनीशिवाय आयपीएलची कल्पना करणे अशक्य आहे. पठाण म्हणाला की, “धोनी या हंगामात केवळ खेळाडू म्हणून नाही, तर मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावेल. ऋतुराज गायकवाड आणि नव्याने संघात आलेल्या संजू सॅमसनला भविष्यातील नेतृत्वासाठी तयार करणे ही धोनीची मुख्य जबाबदारी असेल.” सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी धोनी सर्व सामने खेळेल असे स्पष्ट केले असले, तरी त्याची फलंदाजीची वेळ आणि फिटनेस यावर सर्वांचे बारीक लक्ष असेल. आपल्या १९ व्या हंगामात ५४३९ धावांचा विक्रम घेऊन उतरणारा धोनी सहावे विजेतेपद जिंकून निरोप घेणार का, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ