spot_img

Rinku Singh Father Passes Away : टीम इंडियाचा फलंदाज रिंकू सिंगवर कोसळला दुःखाचा डोंगर!

spot_img

टीम इंडियातून तातडीने परतल्यानंतर रुग्णालयात घेतली अखेरची भेट.

भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज रिंकू सिंह यांच्यावर वर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. त्यांचे वडिल, खचेंद्र सिंह यांचे शुक्रवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना स्टेज-४ यकृताचा कर्करोग होता. प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वडिलांची तब्येत गंभीर असल्याची माहिती मिळताच रिंकू सिंह यांनी टीम इंडियाची साथ तात्पुरती सोडून चेन्नईहून प्रथम दिल्ली आणि त्यानंतर ग्रेटर नोएडा येथे धाव घेतली. गेल्या काही दिवसांपासून खचेंद्र सिंह यांना कृत्रिम श्वसनयंत्रावर ठेवण्यात आले होते. रिंकू यांनी रुग्णालयात जाऊन वडिलांची भेट घेतली; तीच त्यांची शेवटची भेट ठरली.

खचेंद्र सिंह हे घरोघरी गॅस सिलेंडर पोहोचवण्याचे काम करत होते. अत्यंत साध्या परिस्थितीत रिंकू सिंह यांचे बालपण गेले. क्रिकेटमध्ये यश मिळाल्यानंतर रिंकू यांनी वडिलांना मेहनतीचे काम थांबवण्यास सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वडिलांना महागडी स्पोर्ट्स बाईक भेट दिली होती. बाप-लेकांमधील जिव्हाळ्याच्या नात्यामुळे हा धक्का रिंकूंसाठी अत्यंत वेदनादायी ठरला आहे.

सध्या भारतीय संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी आहे आणि रिंकू सिंह संघाचा भाग होते. वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे ते सराव सत्रालाही अनुपस्थित होते. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशु कोटक यांनी पत्रकार परिषदेत रिंकूंच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली होती आणि ते लवकरच संघात परततील, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.

विश्वचषकात रिंकू सिंहने खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत काही सामने खेळले असले तरी त्याला फारशी मोठी खेळी साकारता आली नाही. उपांत्य फेरी गाठल्यास तो संघात पुनरागमन करणार का, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष त्यांच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ