spot_img

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला रोखले; आता झिम्बाब्वेविरुद्ध ‘करो या मरो’ची स्थिती!

spot_img

रिंकू सिंगच्या सुमार कामगिरीने चाहत्यांचा संताप; सेमी फायनलचे समीकरण बनले गुंतागुंतीचे

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाच्या विजयरथाला दक्षिण आफ्रिकेने जोरदार ब्रेक लावला आहे. सुपर-८ फेरीतील पहिल्याच महत्त्वाच्या सामन्यात भारताला ७६ धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली आणि संपूर्ण संघ अवघ्या १११ धावांत गारद झाला. या पराभवामुळे भारताचा नेट रनरेट कमालीचा खालावला असून, आता सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी झिम्बाब्वेविरुद्धचा आजचा (२६ फेब्रुवारी) सामना कोणत्याही परिस्थितीत मोठ्या फरकाने जिंकणे अनिवार्य आहे.

या पराभवानंतर भारतीय फलंदाजांवर, विशेषतः अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि रिंकू सिंग यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. ‘फिनिशर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिंकू सिंगने ५ सामन्यांत केवळ २४ धावा केल्या असून, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो शून्यावर बाद झाल्याने चाहत्यांनी त्याला संघातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कौटुंबिक आणीबाणीमुळे रिंकू सध्या मायदेशी परतल्याचे समजते. आजच्या वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या निकालावरही भारताचे भवितव्य अवलंबून असून, चाहत्यांच्या नजरा आता बारामतीप्रमाणेच चेन्नईच्या मैदानावर खिळल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ