spot_img

Sanjay raut : संजय राऊतांना मोठा दिलासा; मानहानीच्या खटल्यातून सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता!

spot_img

‘त्या’ १५ दिवसांच्या शिक्षेवर पडदा; कोर्टात मेधा सोमय्यांना हात जोडून केला नमस्कार

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात मुंबई सत्र न्यायालयाने राऊत यांची निर्दोष मुक्तता केली आहे. यापूर्वी माझगाव न्यायालयाने या प्रकरणात राऊत यांना दोषी ठरवत १५ दिवसांच्या कोठडीची शिक्षा सुनावली होती, मात्र सत्र न्यायालयाने तो निर्णय आता पूर्णपणे रद्द केला आहे.

हे संपूर्ण प्रकरण मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील शौचालय बांधकामाच्या कथित १०० कोटींच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे आपली प्रतिमा मलीन झाल्याचा दावा डॉ. मेधा सोमय्या यांनी केला होता. मात्र, सत्र न्यायालयात राऊत यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले. विशेष म्हणजे, निकालाच्या वेळी सोमय्या दाम्पत्य आणि संजय राऊत हे तिघेही न्यायालयात उपस्थित होते. निकाल जाहीर होताच राऊत यांनी न्यायालयाबाहेर पडताना मेधा सोमय्या यांना हात जोडून नमस्कार केला, ज्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या निकालावर किरीट सोमय्या यांनी कायदेशीर अभ्यास करून पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ