spot_img

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड

spot_img

अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी स्वीकारली; प्रफुल पटेल यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार.

अजित पवार यांच्या अचानक निधनानंतर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी धीराने पुढे येऊन उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही स्वत:कडे घेतली आहे. गुरुवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुंबईतील वरळी डोममधील हॉलमध्ये झालेल्या आवाजी मतदानाद्वारे सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली.

पक्षातील काही आमदार प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड व्हावी अशी इच्छा व्यक्त करत होते आणि त्यांना सुमारे १५ आमदारांचा गुप्त पाठिंबा होता. मात्र, ‘पवारांच्या पक्षाचा पवारच अध्यक्ष हवा’ असा संकेत दिल्लीतून आल्याने पटेल यांनी शर्यतीतून माघार घेतली. अशा परिस्थितीत पक्षाच्या संविधानानुसार आणि सर्वांच्या विनंतीनुसार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली.

या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, पार्थ पवार यांसह राज्यातील व देशभरातील पक्षाचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. पक्षातील नेते म्हणतात की, अजित पवारांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारली तर पक्षातील आमदार आणि कार्यकर्ते एकसंध राहतील आणि पक्षाला फायदा होईल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ