Sanjay Raut : ‘सगळीकडे कोश्यारीच बसलेत…’; तामिळनाडूतील सत्तासंघर्षावरून राऊतांनी ओढले भाजपचे वाभाडे

spot_img

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सुपरस्टार विजय थलपती याच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाने २३४ पैकी १०८ जागा जिंकून राजकीय इतिहास घडवला असला, तरी सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या बहुमतापासून विजय अवघ्या काही पाऊल दूर आहे, त्यातच काँग्रेसने आपल्या ५ आमदारांचा पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, सर्वाधिक जागा मिळवूनही राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजयला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण न दिल्याने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“सगळीकडे कोश्यारीच बसले आहेत, काही धोत्रात आहेत तर काही सुटाबुटात,” अशा बोचऱ्या शब्दांत टीका करत राऊतांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत भाजपच्या ‘आडमुठ्या’ धोरणाचा निषेध केला. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील परिस्थितीवरही भाष्य केले. ममता बॅनर्जी यांच्या १०० जागा हिसकावून घेतल्याचा आरोप करत, देशाचे गृहमंत्री आणि राज्यपाल सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, असा खळबळजनक दावा राऊतांनी केला. पंजाबमधील बॉम्बस्फोटाचा संदर्भ देत भाजपकडून निवडणुकांसाठी कशा प्रकारे वातावरणनिर्मिती केली जात आहे, यावरही त्यांनी गंभीर ताशेरे ओढले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ