Pune News : पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान 

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:रमेश तांबे

कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते व  पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल यांचे उपस्थितीत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला आहे.

दि.३१ मार्च २०२६ रोजी मंचर येथील थोरांदळे पाईनमळा या ठिकाणी दामोदर जयराम मिंडे वय ६२ वर्षे रा. थोरांदळे पाईनमळा, ता. आंबेगाव जि पुणे हे त्यांचे शेतावरील घरात झोपलेले असताना अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करून त्यांचे डोक्यात लोखंडी पहार ने मारून त्यांचा खून केला आणि सोन्याची अंगठी, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण २९ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरी केला त्या बाबत मंचर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे.पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सुचना केल्या होत्या. सदर गुन्ह्यात कुठलाही धागेदोरे नसताना सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे खुनाच्या गुन्ह्यातील दोन संशईत इसमाचा पथकाने सुमारे ६० कि.मी. चे अंतरात सुमारे १०० सीसीटीव्ही तपासणेत आले व या तपासात आरोपीची गोपनीय माहिती काढून सराईत गुन्हेगारावर दोन दिवस जंगल भागात पाळत ठेवून दि.५ एप्रिल २०२६ रोजी सापळा लावून पुणेवाडी परिसरातून आरोपी नामे कबीर उंबऱ्या काळे वय २४ वर्षे सध्या रा. पुणेवाडी, ता.पारनेर जि.अहिल्यानगर, व एक विधीसंघर्षित बालक यांना जंगल भागात पाठलाग करत ताब्यात घेण्यात आले त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दूचाकी हस्तगत करण्यात आली आहे. अशा रीतीने क्लिष्ट अन आव्हान देणारा गुन्हा उघडकीस आणला आहे तसेच या आरोपी व त्याचे इतर साथीदार यांचेकडून ओतूर, घोडेगाव, मंचर व दिंडोरी पोलीस स्टेशनचे इतर चार जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेंत अशा या उल्लेखनीय कामगिरी बाबत

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स.पो.नि. महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत,सहाय्यक फौजदार दिपक साबळे, पोलीस हवालदार संदिप वारे,अक्षय नवले,राजू मोमीण,अतुल डेरे, मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल, हनुमंत ढोबळे, योगेश रोडे, अजित पवार, या सर्वांचा कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते व पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल यांचे उपस्तितीत पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचा प्रशंसाप्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ