Pune Crime : पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून महिलेची निर्घृण हत्या

spot_img

पुण्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका महिलेची निर्दयी हत्या करण्यात आल्याचे उघड झाले असून या प्रकरणी वकील संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृत महिलेचे नाव पूनम मुन असे असून त्या संजय सावंत यांच्या मुंढवा परिसरातील कार्यालयात गेल्या साडेतीन वर्षांपासून सचिव म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, सावंत यांच्या पत्नीला पूनम आणि संजय यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून हा गंभीर गुन्हा घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेच्या दिवशी, 16 एप्रिल रोजी पूनम नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. याच दिवशी संजय सावंत, त्यांची पत्नी आणि मुलीने मिळून पूनम यांना कार्यालयात मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीचे स्वरूप अत्यंत क्रूर होते. त्यांच्या पायांना दोरीने बांधण्यात आली आणि बॅटने जबर मारहाण करण्यात आली. या अत्याचारात पूनम यांचा मृत्यू झाला.

हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह पोत्यात भरून तो कार्यालयातच लपवून ठेवला. पुढील दिवशी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, त्याआधीच हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पूनम यांच्या पती दिनेश मुन यांनी त्या दिवशी दुपारी पत्नीला फोन केला होता, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न आल्याने त्यांनी संजय सावंत यांच्याशी संपर्क साधला. सावंत यांनी पूनम कुठेतरी मैत्रिणीकडे किंवा नातेवाईकांकडे गेल्या असाव्यात असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

तरीही पूनम घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनेश पत्नीचा शोध घेत त्यांच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांना एक संशयास्पद पोतं दिसले. ते उघडून पाहिले असता आत पूनम यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला अटक केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ