Priyanka Chaturvedi : ठाकरे गटात ‘नारी शक्ती’वरून ठिणगी प्रियंका चतुर्वेदींचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर!

spot_img

चतुर्वेदींच्या ‘बंडखोर’ भूमिकेमुळे मातोश्रीची डोकेदुखी वाढली

महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून आता शिवसेना ठाकरे गटांतर्गत सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. संसदेत हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर जिथे खासदार संजय राऊत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याला ‘भाजपची भोंदूगिरी’ म्हणत कडाडून विरोध केला, तिथेच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेला छेद दिला आहे. “विधेयक मंजूर न होणे हा लोकशाहीसाठी काळा दिवस आहे,” असे म्हणत त्यांनी केवळ खेदच व्यक्त केला नाही, तर आपली भूमिका कधीही बदलणार नसल्याचे स्पष्ट करून पक्ष नेतृत्वाला एक प्रकारे आव्हानच दिले आहे. यामुळे ठाकरे गटात मोठी फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर केलेल्या भूमिकेत स्पष्ट म्हटले आहे की, ज्या महिलांना विधिमंडळात जाण्याची इच्छा होती, त्यांच्या स्वप्नांचा हा चक्काचूर आहे. पक्षाची अधिकृत भूमिका विरोधाची असतानाही, चतुर्वेदींनी ‘आपण जसे आहोत तसे पचनी पडत नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे’ असा गर्भित इशारा देत आपल्या स्वाभिमानी भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे. लोकसभेत १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकासाठी आवश्यक दोन तृतीयांश बहुमत जुळवण्यात सरकारला अपयश आले असले, तरी या निमित्ताने ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस आणि विसंवाद मात्र महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड झाला आहे. प्रियंका चतुर्वेदी यांच्या या पावलामुळे त्या पक्षात राहणार की नव्या वाटा शोधणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ