MP Hemant Savara’s Car Accident : भाजप खासदारांच्या गाडीचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे टळला मोठा अनर्थ

spot_img

पालघरचे भाजप खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या गाडीचा आज सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात घोडबंदर रोड परिसरात घडला असून, एका डंपरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अपघाताची तीव्रता स्पष्टपणे जाणवत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सावरा यांची गाडी मुंबई येथून गुजरात दिशेने जात होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरशी समोरासमोर जोरदार टक्कर झाली. धडक इतकी तीव्र होती की गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. मात्र, गाडीत असलेल्या अत्याधुनिक एअरबॅग्ज वेळेत उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या अपघातात खासदार सावरा हे पूर्णपणे सुरक्षित राहिले असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, गाडी चालवणाऱ्या चालकाला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. नायगाव पोलीस ठाणे येथील पथक घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम केले.

दरम्यान, या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामध्ये गाडीचे झालेले नुकसान स्पष्ट दिसत असून, अपघाताची भीषणता लक्षात येते. या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि सुरक्षित ड्रायव्हिंगची गरज अधोरेखित होत आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी अशा घटनांनी प्रशासन आणि नागरिक दोघांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ