Mother’s Day Wishes : मातृदिनाच्या खास दिवशी अशा द्या आईला शुभेच्छा

spot_img

आई… प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात जवळचं, निस्वार्थ प्रेम देणारं आणि कायम आधार देणारं व्यक्तिमत्त्व. आईसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा असला तरी तिच्याप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात ‘मदर्स डे’ विशेष उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा होणारा हा दिवस आईच्या त्याग, प्रेम आणि संघर्षाला सलाम करण्याचा दिवस मानला जातो.

आई आपल्या मुलांच्या आनंदासाठी आयुष्यभर झटत असते. तिच्या प्रेमाला कोणतीही सीमा नसते. त्यामुळेच मातृदिनाच्या निमित्ताने अनेकजण आपल्या आईला खास शुभेच्छा, भेटवस्तू किंवा प्रेमळ संदेश देत तिच्यावरील भावना व्यक्त करतात.

यंदाच्या मदर्स डे निमित्त तुम्हीही तुमच्या आईला काही सुंदर आणि भावनिक शुभेच्छा पाठवू शकता.

“आईच्या चरणी वसते चारधाम,
तिच्या मायेत आहे ईश्वर…
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आई!”

“ठेच लागता पायी,
वेदना होते तिच्या हृदयी…
तेहतीस कोटी देवांमध्ये,
सर्वश्रेष्ठ माझी आई!”

“आई म्हणजे मायेचा अथांग सागर,
तिच्या प्रेमातच आयुष्याला मिळतो आधार…
माझ्या प्रिय आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“आई म्हणजे माया, आई म्हणजे छाया,
तिच्या कुशीतच सापडते खरी सुखमाया…
मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

मातृदिन हा केवळ एक दिवस नसून, आईने दिलेल्या प्रेमाची आणि तिच्या आयुष्यभराच्या त्यागाची आठवण करून देणारा भावनिक क्षण आहे. या खास दिवशी आपल्या आईला वेळ द्या, तिच्यासोबत आनंदाचे क्षण जगा आणि तिच्यावरील प्रेम व्यक्त करा.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ