spot_img

Raj Thackeray : ‘परक्यांना कळतं, पण स्वकीयांना नाही!’; जपानी मुलीच्या बहाण्याने राज ठाकरेंचा संघावर ‘राज’बाण

spot_img

मराठी भाषेसाठी थेट सरसंघचालकांना टोला; “मराठीला आता अर्थार्जनाची भाषा बनवा”, राज ठाकरेंचे आवाहन

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देणाऱ्या आणि दररोज एक नवीन मराठी शब्द शिकणाऱ्या एका जपानी तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओची दखल आता थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली असून, त्यांनी या तरुणीचे कौतुक करतानाच ‘स्वकीयांना’ आणि प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) खडे बोल सुनावले आहेत.

राज ठाकरे यांनी आपल्या ‘X’ (ट्विटर) पोस्टमध्ये जपानी मुलीला धन्यवाद दिले आहेत. ते म्हणाले की, “हजारो किलोमीटरवरून येणारे पाहुणे महाराष्ट्रात आल्यावर इथल्या भाषेचा आदर करतात, ती शिकण्याचा प्रयत्न करतात. केवळ जपानी मुलगीच नाही, तर नवी मुंबईत आलेला ‘कोल्डप्ले’चा ख्रिस मार्टिन असो वा मुंबईतील विविध देशांचे दूतावास, हे सर्वजण मराठीचा सन्मान करतात. हे परक्यांना कळतं, पण दुर्दैवाने इथल्या काही स्वकीयांना ते समजत नाही.”

यावेळी राज ठाकरेंनी थेट सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला. “मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला आले होते. आपण महाराष्ट्रात आहोत, आपण स्वतः मराठी आहोत, मग त्यांना थोडा तरी संवाद मराठीत साधावासा का वाटला नाही?” असा रोकडा सवाल राज यांनी उपस्थित केला.माजी सरसंघचालकांचा दाखला त्यांनी माजी सरसंघचालक सुदर्शनजींचे उदाहरण दिले. सुदर्शनजींचे बालपण रायपूरमध्ये गेले असले तरी, त्यांनी आपल्या मातृभाषेचा (कन्नड) विसर कधी पडू दिला नाही आणि कर्नाटकात गेल्यावर ते आवर्जून कन्नडमध्येच बोलायचे, याची आठवण राज ठाकरेंनी करून दिली.

केवळ टीका करून न थांबता राज ठाकरे यांनी मराठी बांधवांना एक दिशा दिली आहे. ते म्हणाले की “इथल्या मूठभर स्वकीयांना मराठीत बोलायला भाग पाडण्यासाठी आपल्याला आपली भाषा ‘ज्ञानाची आणि अर्थार्जनाची’ (रोजगाराची) भाषा बनवावी लागेल. जेव्हा मराठी शिकल्याशिवाय पर्याय उरणार नाही, तेव्हाच या भाषेचा खऱ्या अर्थाने दबदबा निर्माण होईल.”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ