spot_img

Chhatrapati Sambhajinagar : शाळेत भरली ‘चिमुकली विधानसभा’! संभाजीनगरच्या गाडीवाट जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे ‘आपले सरकार’

spot_img

निवडणूक, मतदान अन् मुख्यमंत्र्यांची निवड; लोकशाहीचे धडे आता केवळ पुस्तकात नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून!

लोकशाही म्हणजे काय? निवडणूक कशी लढवली जाते? आणि मंत्रिमंडळ कसं काम करतं? या प्रश्नांची उत्तरं आता गाडीवाट येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना तोंडपाठ आहेत. केवळ पुस्तकी ज्ञान न देता, भविष्यातील सुजाण नागरिक घडवण्यासाठी या शाळेने एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवला आहे. शाळेत चक्क विद्यार्थ्यांचे ‘स्वतःचे मंत्रिमंडळ’ स्थापन करण्यात आले असून, त्याची निवड अगदी खऱ्या निवडणुकांप्रमाणे लोकशाही पद्धतीने करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया आणि मंत्रिमंडळाची रचना :
या प्रक्रियेत वर्गावर्गात जाऊन प्रचार झाला, मतदान झाले आणि लोकशाही मार्गाने १३ सदस्यांची निवड करण्यात आली. या निवडून आलेल्या सदस्यांनी मिळून आपला ‘मुख्यमंत्री’ निवडला आहे. या मंत्रिमंडळात केवळ मुख्यमंत्रीच नाही, तर कामाच्या विभागणीनुसार विविध खात्यांचे मंत्रीही आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री ही महत्वाची पदे आहेत. तर आरोग्य मंत्री, क्रीडा मंत्री, सांस्कृतिक मंत्री, पर्यावरण मंत्री आणि अगदी ‘परसबाग’ मंत्री अशी विविध खाती आहेत.

कसे चालते या बाल-सरकारचे काम?
हे मंत्रिमंडळ केवळ नावापुरते नसून, शाळेतील दैनंदिन शिस्त आणि कामांची जबाबदारी या विद्यार्थ्यांवर आहे.
1. अहवाल साखळी: प्रत्येक मंत्री आपल्या खात्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देतो.
2. समन्वय: मुख्यमंत्री हा सर्व गोळा केलेला रिपोर्ट शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करतात.
3. विकेंद्रीकरण: जसे शाळेचे मंत्रिमंडळ आहे, तसेच प्रत्येक वर्गाचेही स्वतंत्र मंत्रिमंडळ असून ते वर्गातील शिस्तीवर लक्ष ठेवते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ