spot_img

Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीवर दुःखाचा डोंगर! भावाच्या निधनाने ‘अप्सरे’चे कुटुंब शोकसागरात

spot_img

काही दिवसांपूर्वीच भावाच्या लग्नात लुटला होता आनंद; आता ‘अन्नूमा’च्या एक्झिटने सोनाली भावूक.

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या कुटुंबावर सध्या दुःखाचे सावट पसरले आहे. सोनालीचा चुलत भाऊ अनिरुद्ध कुलकर्णी (ज्याला ती प्रेमाने ‘अन्नूमा’ म्हणायची) याचे नुकतेच निधन झाले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच सोनालीने तिच्या चुलत भावाच्या लग्नात हजेरी लावली होती, तिथले आनंदाचे फोटोही तिने शेअर केले होते. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही आणि अनिरुद्धच्या जाण्याने कुलकर्णी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

भावासाठी लिहिलेली ती हळवी पोस्ट :
आपल्या लाडक्या भावाला निरोप देताना सोनालीने सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले की “आमचा अन्नूमा… हे जग सोडून तू एका चांगल्या ठिकाणी निघून गेलास. तू माझ्या आयुष्यातील सर्वात आध्यात्मिक, निष्पाप आणि सर्वांवर निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्ती होतास. तुझ्या हातचा तो चहा आणि तुझं तबला वाजवणं नेहमी आठवणीत राहील.”

सोनालीच्या घरात गेल्या काही दिवसांपासून लग्नाची लगबग होती. भावाच्या लग्नाचे आनंदाचे क्षण सोशल मीडियावर शेअर करून तिने चाहत्यांनाही त्या आनंदात सहभागी करून घेतले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एका बाजूला लग्नाचा आनंद असतानाच दुसऱ्या बाजूला अनिरुद्धच्या निधनाची बातमी आली, ज्यामुळे चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. ‘अप्सरा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनालीला या कठीण काळातून सावरण्यासाठी तिच्या चाहत्यांकडून बळ दिले जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ