शमी-ईशान किशन कराराबाहेर; बुमराह-जडेजा A ग्रेडमध्ये कायम, पाच खेळाडूंना यादीतून वगळण्यात आलं
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी सत्रासाठी केंद्रीय कराराची सुधारित यादी जाहीर केली असून, यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत. कसोटी आणि एकदिवसीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या शुभमन गिलला थेट A ग्रेडमध्ये बढती देण्यात आली आहे.
दुसरीकडे, अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना A ग्रेडमधून B ग्रेडमध्ये स्थानांतरित करण्यात आलं आहे. मात्र, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी आपलं A ग्रेडचं स्थान कायम राखलं आहे. या यादीतील सर्वात मोठा धक्का म्हणजे मोहम्मद शमीचं नाव केंद्रीय करारातून वगळण्यात आलं आहे. रणजी ट्रॉफीत दमदार कामगिरी करूनही शमीला राष्ट्रीय संघात संधी न मिळाल्यानं बीसीसीआयनं त्याला कराराबाहेर ठेवलं आहे.
तसंच, टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळालेल्या ईशान किशनलाही केंद्रीय करारात जागा देण्यात आलेली नाही. प्रथमश्रेणी क्रिकेट न खेळल्यामुळे मागील यादीतून वगळण्यात आलेल्या ईशानला यंदाही संधी मिळाली नाही. याशिवाय, सरफराज खान, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांनाही केंद्रीय कराराच्या यादीत स्थान देण्यात आलेलं नाही.
केंद्रीय करारातून वगळलेले खेळाडू (5)
मोहम्मद शमी, ईशान किशन, रजत पाटीदार, सरफराज खान, मुकेश कुमार
ग्रेड A: शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा
ग्रेड B: रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर
ग्रेड C: अक्षर पटेल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, नीतीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रवि बिश्नोई, ऋतुराज गायकवाड




