spot_img

IND vs NZ : इशान किशन मैदानावर धावताना दिसल्याने सूर्याकुमार यादवच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह

spot_img

वायजॅग T20 मध्ये प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यानंतर इशानचा व्हिडिओ व्हायरल, आकाश चोपडांचाही संशय व्यक्त

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ ) यांच्यात वायजॅग येथे झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात इशान किशनला (Ishan Kishan) प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला संधी देण्यात आली. टॉसवेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने इशान किशनला दुखापत झाल्यामुळे तो खेळू शकला नाही, असं स्पष्ट केलं.

मात्र सामन्यादरम्यान एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. इशान किशन मैदानावर धावताना आणि सहकाऱ्यांना ड्रिंक्स देताना दिसला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. खरंच इशानला दुखापत झाली होती का, की टीम मॅनेजमेंटने वेगळं कारण दिलं, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गुवहाटी येथे झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात फिल्डिंग करताना इशानला दुखापत झाली होती, असा दावा करण्यात आला होता. मात्र चौथ्या सामन्यात त्याची मैदानावरील चपळ हालचाल पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. लाइव्ह कॉमेंट्रीदरम्यान आकाश चोपडांनीही यावर प्रतिक्रिया दिली. इशान ज्या पद्धतीने पळत होता, ते पाहता त्याला गंभीर दुखापत झाल्यासारखं वाटत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. पुढील सामन्यात तो खेळताना दिसेल, अशी शक्यताही चोपडांनी बोलून दाखवली.

दरम्यान, या सामन्यात भारताला मोठा धक्का बसला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 7 विकेट्स गमावत 215 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात भारतीय संघ 165 धावांतच आटोपला. परिणामी न्यूझीलंडने हा सामना 50 धावांनी जिंकत मालिकेत पुनरागमन केलं. इशान किशनच्या इंजरीबाबत सुरू झालेल्या चर्चेमुळे आता पुढील सामन्यात त्याचा समावेश होणार का, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ