spot_img

India’s Coldest Village: भारतातील दुसरे सर्वात थंड गाव, जिथे हिवाळ्यात पाणीही गोठते

spot_img

‘गेटवे टू लडाख’ म्हणून ओळखले जाणारे द्रास गाव – निसर्गाच्या कठोरतेला तोंड देणाऱ्या स्थानिकांची कहाणी

बहुतांश लोकांना वाटते की भारतातील सर्वात थंड ठिकाणे फक्त जम्मू-काश्मीरमध्ये आहेत, पण द्रास या गावात थंडी इतकी कडक असते की ओले कपडेही बर्फासारखे गोठतात. लडाखमध्ये प्रवेश करण्यासाठी झोजिला खिंडीतून येणाऱ्या प्रवाशांसाठी द्रास हे पहिले महत्त्वाचे गाव आहे. भारतातील पहिले आणि जगभरातील दुसरे सर्वात थंड ठिकाण म्हणून द्रास प्रसिद्ध आहे.

कारगिलपासून फक्त ६४ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात हिवाळ्यात तापमान -२०°C ते -२५°C पर्यंत खाली जाते. थंडीमुळे पाणी, नद्या आणि ओढे गोठतात, त्यामुळे स्थानिक लोकांना पाण्याचा वापर करण्यासाठी बर्फ वितळवावा लागतो. हिवाळ्यात द्रासचे बाह्य जगाशी संपर्क तुटतो, त्यामुळे उन्हाळ्याच्या काळातच लोक अन्नधान्य, लाकूड आणि भाज्यांचा साठा करतात.

स्थानिक लोक पारंपरिक जाड फर आणि लोकरीचे कपडे घालतात. त्यांचे जीवन शेती, पशुपालन आणि पर्यटनावर आधारित आहे. उन्हाळ्यात बार्ली, बटाटे आणि वाटाण्याची लागवड केली जाते. ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी द्रास आकर्षणाचे केंद्र आहे. झोजिला पास, द्रास युद्ध स्मारक, द्रौपदी कुंड आणि मुश्को व्हॅली येथे पर्यटक भेट देतात.

द्रौपदी कुंड

द्रास गावातील प्रसिद्ध द्रौपदी कुंड, महाभारतातील द्रौपदीशी संबंधित आहे. पौराणिक कथांनुसार, पांडवांसोबत स्वर्गात जाण्यापूर्वी द्रौपदीने येथे स्नान केले. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, द्रौपदीच्या अश्रुंनी कुंड तयार केले. ही कुंडाची पाणी कधीही गोठत नाही असे स्थानिक सांगतात. याचे पाणी पवित्र मानले जाते, जे पिल्याने गर्भधारणा सुधारते आणि त्वचेच्या समस्या कमी होतात अशी लोकांची श्रद्धा आहे. द्रास गाव थंडीतून आणि निसर्गाच्या कठोरतेतून आपले वैभव टिकवत आहे, तर पर्यटकांसाठी अद्वितीय अनुभव देत राहते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ