spot_img

Otur News : “राम कृष्ण हरी” मंत्राचे बीजारोपण करणारी ओतूर ही अध्यात्मिक राजधानी – ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम

spot_img

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ओतूर ही भूमी अखंड वारकरी संप्रदायाला मिळालेल्या “राम कृष्ण हरी ” मंत्राचे बीजारोपण करणारी ओतूर ही अध्यात्मिक राजधानी असल्याचे मत ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे माऊली ) यांनी ओतूर ( ता.जुन्नर ) येथे व्यक्त केले. जगद्‌गुरू बाबाजी चैतन्य महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे सद्‌गुरू- शिष्य भेटीच्या पुर्णाकृती शिल्पाचा भव्य लोकार्पण सोहळा बुधवारी ( दि.२४ ) ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम, ह.भ.प.गुरूवर्य तुळशिराम महाराज सरकटे यांच्या शुभहस्ते जुने बस स्थानक ओतूर ( ता.जुन्नर ) येथे संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.

पुढील पिढीला स्मरण राहण्यासाठी या शिल्पाचे उभारीकरण झालं असून,या शिल्पाचा अनावरण सोहळा संपन्न झाला असल्याने ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे माऊली ) यांनी समाधान व्यक्त केले.तर प्रास्ताविक करताना ह.भ.प.गंगाराम महाराज डुंबरे यांनी सांगितले ओतूर येथे त्रिशकोत्तर सोहळा संपन्न झाला.अनुग्रहाचे एक शिल्प या ऐतिहासिक भूमीत उभे रहावे या करीता सरपंच डॉ.छायाताई तांबे व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांच्या सहकार्याने उभे करून धर्मध्वजाची देखील उभारणी करण्यात आली याकरिता सहा महिन्याचा कालावधी लागला.यासाठी अनेक जणांनी सर्वोतोपरी मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ओतूरच्या सरपंच डॉ.छाया तांबे यावेळी बोलताना म्हणाल्या की, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम यांच्या नेतृत्वाखाली त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह सोहळा ओतूर येथे संपन्न झाला.या सप्ताहावेळी ज्यांनी अवघ्या वारकरी संप्रदायाला “राम कृष्ण हरी” मंत्र दिला.त्या चैतन्य महाराज व श्री संत तुकाराम महाराजांच्या महाराजांच्या अनुग्रहाचे शिल्प या भूमीत व्हावे,यासाठी ज्ञानेश्वर महाराज यांची प्रेरणा घेऊन,येथील जुन्या स्टँडवर शिल्प उभारून,ओतूरच्या वैभवात भर टाकणारा क्षण ओतूरकर यांनी अनुभवला.या गुरू- शिष्य भेटीच्या पूर्णाकृती शिल्पांचा भव्य लोकार्पण ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम व ह.भ.प.तुळशीराम महाराज सरकटे यांच्या हस्ते संपन्न झाला असून, यावेळी प्रमुख उपस्थिती ह.भ.प.गंगाराम महाराज डुंबरे,ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे,माजी आमदार बाळासाहेब दांगट,माजी जि.प.सदस्य मोहीत ढमाले,तुषार थोरात,अंकुश आमले,शरदराव लेंडे,पंचायत समितीचे माजी सभापती विशाल तांबे,सरपंच डॉ.छाया तांबे,उपसरपंच प्रशांत डुंबरे,दिलीप डुंबरे,विनायक तांबे,वैभव तांबे,माऊली कबाडी,धनंजय डुंबरे,आशिष शहा,स्मिता डुंबरे,दत्तात्रय डुंबरे,रंगनाथ घोलप,सुदाम घोलप,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वनघरे,स्वरमील डुंबरे,यतीन शेटे,सुमेध कांबळे आदी मान्यवर तसेच विविध गावचे सरपंच,उपसरपंच व गामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वप्रथम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जलशुद्धीकरण प्रकल्प अंदाजे २ कोटी रूपये खर्च करून ४.२५ लाख लिटर प्रति दिवस क्षमता असलेला प्रकल्प उभारला असून याचे लोकार्पण देखील यावेळी करण्यात आले. यावेळी शिल्पकार यतीन शेटे व इंजिनिअर स्वरमील डुंबरे यांचा ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे माऊली ) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ