पापाराझी व चाहत्यांना चांदीची नाणी वाटली.
बिग बॉस सीझन 19 (Big Boss 19) नुकताच संपला आहे. या सीझनमध्ये जर जास्त कोणाचं नाव चर्चेत राहिलं असेल तर ती म्हणजे तान्या मित्तल. संपूर्ण सीझनमध्ये तिने तिच्या संपत्तीच्या कहाण्यांनी चर्चा निर्माण झाली. पण त्याचबरोबर तिने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजनही केले. तान्या मित्तल (Tanya Mittal) तिच्या घरातल्या गोष्टी, किंवा तिच्या प्रॉपर्टीबदद्ल सांगत असताना बिग बॉस घरातील लोक तसेच हा शो पाहणारे प्रेक्षक दर वेळी आश्चर्य व्यक्त करत असतं. तसेच अनेकांनी तर तान्याच्या घरापासून ते तिच्या कारखान्यापर्यंत सर्व गोष्टींची चौकशी करण्याचा देखील प्रयत्न केला.
जेव्हा मालती वाईल्ड कार्ड म्हणून आली होती तेव्हा तिने आणि सलमान खानने देखील एकदा तान्याला याबद्दल सांगितले होते की बाहेर अनेक लोक तिच्या घराबद्दल आणि तिच्या बिझनेसबद्दल खरं-खोटं तपासून पाहत आहेत. आणि अनेकजण तिला फेक म्हणत आहेत. पण आता तान्या मित्तलने शोमधून बाहेर आल्यावर तिच्या सर्व संपत्तीचा पुरावा दिला आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एक-दोन लोकांना नाही तर अनेकांना चांदीची नाणी वाटताना दिसत आहे.




