spot_img

Manasi Naik Ex Husband Second Marriage : सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पूर्व पतीने थाटला दुसरा संसार,थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

spot_img

अभिनेत्री मानसी नाईक हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर प्रदीपनं काही दिवसांतच विशाखा पनवारसोबत साखरपुडा केला होता.

मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Entertainment Industry) लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सध्या चर्चेत आहे, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वी मानसी नाईक तिचं वैवाहिक आयुष्य आणि त्यानंतर नवऱ्यासोबतचे वाद यामुळे ती चर्चेत होती. अखेर दोघांनी लग्नाच्या काही दिवसांतच घटस्फोट घेतला आहे. अशातच आता मानसी नाईकचा एक्स हसबंड प्रदीप खरेरानं (Pardeep Kharera) आपलं दुसरं लग्न उरकलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, मानसी नाईकच्या एक्स हसबंडनं जिच्यासोबत आपली दुसरी लग्नगाठ बांधली आहे, तीसुद्धा प्रसिद्ध अभिनेत्रीच आहे.

अभिनेत्री मानसी नाईक हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर प्रदीपनं काही दिवसांतच विशाखा पनवारसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर जवळपास एका वर्षानं दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी थाटामाटात आपली लग्नगाठ बांधली. दोघांच्या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मानसी नाईक आणि बॉक्सर प्रदीप खरेरा यांनी लॉकडाऊनमध्ये आपली लग्नगाठ बांधलेली. लॉकडाऊन असूनही दोघांच्या लग्नाची चर्चा जोरदार रंगलेली. पण, काही दिवसांतच दोघांमधले वाद चव्हाट्यावर आलेले. त्यानंतर दोघांनी एकमेंकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. आता त्यानं आपलं दुसरं लग्न आटोपलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ