spot_img

PMC Election : बड्या नेत्याने हाती मशाल घेतल्याने निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची वाढली ताकद !

spot_img

पुण्यातील एका माजी नगरसेवकासह अनेक नेत्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहे. काही जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती, त्यासाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर किंवा तत्पूर्वी महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकींसाठी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच आता पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षात जोरदार इनकमिंग झाली आहे. एका माजी नगरसेवकासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली आहे. त्यामुळे आगामी पुणे (Pune) महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुण्यातील माजी नगरसेवक सुनील गोगले, भाजप माथाडी पुणे शहर उपाध्यक्ष अक्षय भोसले, मातंग एकता आंदोलनाच्या भारती मिसाळ, क्रांतिवीर झोपडपट्टी संघटनेचे राजेश परदेशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्रवण केकाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना संघटक वसंत मोरे, पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ