spot_img

Samantha Ruth Prabhu : समंथा राजच्या इन्स्टा पोस्टने खेचले नेटकऱ्यांचे लक्ष

spot_img

ईशा फाउंडेशनमध्ये ३० पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न; ‘आता मी त्याची प्रॉब्लेम’ म्हणत समंथाची मजेशीर पोस्ट व्हायरल

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिनं 1 डिसेंबर रोजी ‘द फॅमिली मॅन’ (The Family Man) निदिमोरू याच्यासोबत लग्नाच्या नव्या अध्यायाची सुरुवात केली. कोईंबतूरमधील ईशा फाऊंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात अगदी शांत आणि आध्यात्मिक वातावरणात हा सोहळा पार पडला. फक्त ३० जणांच्या उपस्थितीत झालेलं हे साधं, पण मन भावणारं लग्न समंथानं अचानक इन्स्टाग्रामवर शेअर करताच चाहत्यांना गोड सरप्राईज मिळालं.

लग्नानंतर समंथा सतत इन्स्टा स्टोरीत तिच्या खास क्षणांचे फोटो शेअर करत आहे. त्यातलं एक पोस्ट मात्र नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. मैत्रिणीनं शेअर केलेला तिचा वरमाळेचा फोटो समंथानं आपल्या स्टोरीत टाकत लिहिलं “तो क्षण… जेव्हा जाणवलं की आता मी त्याची ‘प्रॉब्लेम’ झाले आहे.” या मजेदार कमेंटवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या.

समंथाचा लग्नातील लूकही चर्चेत आहे. पारंपरिक लाल बनारसी साडी, पारंपरिक दागिने, हलकासा मेकअप आणि साधं हेअरस्टाइल या लूकने समंथा अधिकच खुलून दिसली. तर राजनं साधा कुर्ता पायजमा परिधान केला होता. दोघांचा साधेपणातला देखणा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला.

नाग चैतन्यपासूनचा तिचा घटस्फोट, त्यानंतर मायोसिटिससारख्या आजाराशी लढा या सर्वांमुळे समंथाविषयी सहानुभूती आणि जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यामुळे तिचं दुसरं लग्न पाहून चाहत्यांनी मोठ्या प्रेमानं शुभेच्छांचा वर्षाव केला.

राज निदिमोरू आणि समंथा आधीपासूनच एकमेकांना ‘द फॅमिली मॅन 2’ आणि ‘सिटाडेल: हनी बनी’च्या शूटिंगदरम्यान ओळखीचे होते. दोघांनीही पूर्वीच्या लग्नातून घटस्फोट घेतल्यानंतर नव्या प्रवासाला होकार दिला… आणि त्याला चाहत्यांनीही मोठ्या मनानं स्वीकारलं.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ