spot_img

Nashik Tree Cutting : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाणांनी स्पष्ट केली भूमिका

spot_img

तपोवनाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिकमधील (Nashik) तपोवन परिसरातील साधुग्रामच्या (Sadhugram) जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात (Nashik Tree Cutting) पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. या मुद्द्यावर राजकीय नेते, सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून याबाबत आवाज उठवत आहेत. याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी म्हटलंय की, तपोवन येथे कुंभमेळ्याच्या निमित्ताने वृक्षतोड करण्याचा काहींची मानस आहे, तपोवन तोडून भाविकांची सेवा करण्याचा काहींचा मानस आहे. ⁠काळाची गरज पाहता वृक्षतोड झाली पाहीजे नाही. ३०-४० किमी चालून लोक कुंभमेळाव्यात शाहीस्नान करत होते हे आम्ही पाहिले आहे. जागा उपलब्ध असताना वृक्ष तोड का करावी? हा प्रश्न आहे. ⁠वृक्ष तोड थांबवावी ही आमची भूमिका आहे, वृक्षप्रेमी म्हणून अनेक लोक बोलत आहेत, महायुतीमध्ये जरी असलो तरी जरी काही असले तर आम्ही बोलण्याची ताकद ठेवतो, सरकारने जनतेसाठी वृक्षप्रेमींचा विचार करावा असंही त्यांनी म्हटलंय

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ