spot_img

Navi Mumbai : अनैतिक मानवी वाहतूक गुन्हे कक्षेने जुहूगांव येथील सलून आणि स्पा मधून 6 पीडित महिलांची केली सुटका

spot_img

विजय गायकवाड (नवी मुंबई)

नवी मुंबई पोलिस आयुक्तालय परिसरात अनैतिक व्यापार, अवैध धंदे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सह पोलीस आयुक्त संजय ऐनपुरे यांनी दिले असल्याने त्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षचे वपोनि पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत दि 30 नोव्हेंबर रोजी अशी माहिती मिळाली की, जुहू गाव येथील अपर्णाज सलून आणि स्पा येथे 6 हजार रुपये घेऊन मसाजच्या नावाखाली तेथे आलेल्या महिलाकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत आहेत त्या बातमीची शहानिशा करून सदर स्पा वर कारवाई करण्यात आली.

वपोनि पृथ्वीराज घोरपडे यांनी गोपनीय बातमीच्या आधारे बनावट ग्राहकास अपर्णाज सलून आणि स्पा शॉप न. 1 देवीजोती हॉटेल जवळ जुहूगांव सें 11 वाशी येथे बनावट ग्राहक पाठवून दि 30 नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवून त्यांच्या सांकेतिक ईशाऱ्यावरून स्पाची व्यवस्थापक व मालक असिमा रॉबिन घोष (34) रां. साई कुंज सोसायटी सें 11 वाशी मूळ गाव कलकत्ता हिला ताब्यात घेण्यात आले. तर तिचा भागीदार व्यावसायिक पाहिजे असलेला आरोपी नूर आलम शेख राहणार चेंबूर यांनी आपसात संगनमत करून आरोपीनी 6 पीडित महिलांना बॉडीमसाज करण्याच्या नावाखाली मसाज शॉप मध्ये सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसाया करीता वापरून बेकायदेशीर आणि अनैतिक कामासाठी पीडित मुलीना वेश्या व्यवसायकरीता वापरून बेकायदेशीर आणि अनैतिक कामासाठी पीडित मुलींना कामी लावले बनावट ग्राहकांकडून 6 हजार रुपये स्वीकारून पीडितेच्या कमाईवर स्वतःची उपजीविका करीत असल्याचे आढळून आले.

सदर आरोपी विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि न 627/2025 बी एन एस कलम 3,4,5 व 7 सह अन्वये 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस मा. न्यायालयाने दि 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वाशी पोलीस ठाणे करीत आहे. अपर पोलीस आयुक्त संजय ऐनपुरे यांच्या मार्गदर्शना खाली वपोनि पृथ्वीराज घोरपडे सपोनि योगेश देशमुख, पो उप नि सरिता गुडे, पो ह. अनिल मांडोळे, ठाकूर, चव्हाण, परासूर, अडकमोल, चालक पोह मोहिते यांनी या कारवाईत भाग घेतला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ