spot_img

Bomb Threat : इंडिगोच्या फ्लाइटला बॉम्बची धमकी, मुंबईत झालं इमर्जन्सी लँडिंग

spot_img

फ्लाइटने उड्डाण केल्यानंतर आला धमकीचा ई-मेल.

हैदराबादवरुन कुवैतला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. या विमानात मानवी बॉम्ब आहे, असा धमकीचा ई-मेल आला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ कारवाई करत फ्लाइटच मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करायला लावलं. सुरक्षा यंत्रणा याचा तपास करत आहेत. विमानाला एअरपोर्टच्या आयसोलेश बे मध्ये पाठवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी इंडिगोच्या फ्लाइटने हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन कुवैतला जाण्यासाठी उड्डाण केलं. फ्लाइटने उड्डाण केल्यानंतर धमकीचा ई-मेल आला. त्यात विमानात बॉम्ब असल्याची धमकी होती.

त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने ATC तात्काळ विमानाला मुंबईच्या दिशेने वळवलं व इर्मजन्सी लँडिंग करायला लावली. फ्लाइटचं सुरक्षित लँडिंग झालं आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लँडिंग नंतर विमानाला आयसोलेशनमध्ये नेण्यात आलं.तिथे बॉम्ब निकामी पथक, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्स (CISF) आणि अन्य सुरक्षा टीम्सनी विमानाची तपासणी सुरु केली आहे. प्रारंभिक रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत कुठलीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटकं सापडलेली नाहीत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ