पुण्यात आतापर्यंत किती टक्के मतदान?
राज्यातील विविध भागांमध्ये आज 2 डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. पण पुणे शहरात मतदानादरम्यान नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. कुठे ईव्हीएम मशीन बंद पडल्या, तर कुठे बिबट्याची दहशत दिसून आली. पण तरी देखील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावला.. पुणे जिल्ह्यातील 12 नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींमध्ये मंगळवारी मतदानाची सुरुवात संथ गतीने झाली, पहिल्या चार तासांत फक्त 20.22% मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी (MVA) यांच्यातील लढाईच्या रूपात रंगल्या आहेत. राज्यात सध्या महायुतीची सत्ता आहे. ज्यामध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर पक्षांचा देखील समावेश आहे. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीसह अनेक इतर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
पुणे जिल्ह्यातील (Pune District) 15 महानगरपालिका निवडणुकांमध्ये मंगळवारी सकाळपर्यंत मतदानाचा टक्का वाढल्याचं चित्र दिसून आलं आणि पहिल्या चार तासांत मतदान 20.22% पर्यंत पोहोचलं. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव मावळमध्ये सर्वाधिक 28.33% मतदान झालं, तर दौंड नगर परिषदेत सर्वात कमी 13.21%.मतदान झाले.
पुणे जिल्ह्यातील कोणत्या मतदार संघात किती मतदान झालं?
दौंड – 13.21, लोणावळा – 22.23, चाकण – 23.60, शिरूर – 13.23, इंदापूर -24.95, जेजुरी-21.03, आळंदी – 24.54, राजगुरुनगर- 17.24, सासवड – 24.30, तळेगाव दाभाडे-16.28, जुन्नर-17.59, भोर – 21.75, वडगाव मावळ-28.33, मालेगाव बुद्रुक – 24.12, मंचर – 27.83.




