spot_img

Kolhapur Crime : कोल्हापुरात महिलेसोबत मास्तर नको त्या अवस्थेत सापडला,गावकऱ्यांनी बेदम हानलं !

spot_img

गावकऱ्यांनी मास्तराला बेदम चोपलं, नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकवडेत एका शिक्षकाला महिलेचा नाद चांगलाच महागात पडला आहे. महिलेच्या घरी अनैतिक संबंधातून नातेवाइकांनी रंगेहाथ पकडले. संतापलेल्या नातलगांनी त्याला बेदम मारहाण करीत दोरीने बांधून घरातच बंद केले. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिसांनी त्या शिक्षकाला ताब्यात घेतले. या संपूर्ण घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजीतील (Ichalkaranji) एका प्रसिद्ध शाळेत कार्यरत असलेल्या या तरुण शिक्षकाचे संबंधित महिलेसोबत बरेच दिवस संबंध असल्याचा संशय घरच्यांना होता. अनेकदा ताकीद देऊनही परिस्थिती न बदलल्याने नातेवाइकांचा रंगेहाथ सापडताच उद्रेक झाला. शुक्रवारी सायंकाळी तो महिलेच्या घरी आल्याचे पाहताच घरच्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली आणि नग्न अवस्थेत बांधून ठेवले.

प्रसंगाची माहिती पसरताच परिसरातील लोक मोठ्या संख्येने घरासमोर जमा झाले. काही नागरिकांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेच्या नातलगांनी गुन्हा दाखल करण्यावर ठाम भूमिका घेतली. वाढत्या जमावामुळे परिस्थिती बिघडू नये म्हणून शिरोळ पोलिसांनी मोठा बंदोबस्तासह घटनास्थळी धाव घेतली. तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी शिक्षकाची सुटका करून त्याला पोलीस ठाण्यात सुरक्षितरित्या हलवले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ