WPL 2026 Auction : महिला प्रीमियर लीग 2026 च्या लिलावात सगळ्यात महागडी खेळाडू ठरली दीप्ती शर्मा !

spot_img

एकूण 67 खेळाडू विकल्या गेल्या, ज्यात 23 परदेशी खेळाडूंचा समावेश होता.

महिला प्रीमियर लीग 2026 च्या लिलावात एकूण 67 खेळाडू विकल्या गेल्या, ज्यात 23 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. दीप्ती शर्मा (Deepti Sharma) ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. दीप्ती शर्माला यूपी वॉरियर्सने आरटीएम (ट्रेड मार्क्सचा अधिकार) वापरून 3.2 कोटी रुपयांना खरेदी केले. मुंबई इंडियन्समध्ये परतलेली अमेलिया केर ही सर्वात महागडी परदेशी खेळाडू होती. लिलावात 67 खेळाडूंवर एकूण 40.8 कोटी रुपये खर्च झाले. यूपी वॉरियर्सकडे सर्वाधिक पैसे असल्याने त्यांनी सर्वात महागडे खेळाडू खरेदी केले.

महिला प्रीमियर लीग 2026 च्या लिलावात भारतीय अष्टपैलू दीप्ती शर्मा सर्वात महाग खेळाडू ठरली. दिल्ली कॅपिटल्सने दीप्तीवर पहिली बोली लावली होती. दिल्ली कॅपिटल्सने 50 लाखांच्या बोलीवर दीप्तीला विकत घेतले होते, परंतु यूपीने राईट टू मॅच कार्डचा वापर करून 3 कोटी 20 लाख रुपयांना तिला आपल्या संघात समाविष्ट केले. दीप्तीला यूपीने लिलावापूर्वी रिलीज केले होते, परंतु लिलावात या खेळाडूला पुन्हा आपल्या संघात सामील केले. अशा प्रकारे दीप्ती या लिलावातील सर्वात महाग खेळाडू ठरली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ