या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत, अर्शदीप सिंग आणि रोहित शर्मा मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात उद्यापासून (30 नोव्हेंबर) रांचीमध्ये वनडे सीरिजला सुरूवात होत आहे. कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्लायावर ही वनडे मालिक जिंकण्यासाठी भारतीय संघ जिद्दीने मैदानात उतरणार आहे. मात्र रविवारी दक्षिण आफ्रिकेशी भिडण्यापूर्वी टीम इंडियाचं एक फोटोशूट झालं, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत, अर्शदीप सिंग आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. विराट कोहलीनेही फोटोशूटमध्ये भाग घेतला होता. पण सर्वात मजेदार घटना ऋषभ पंतसोबत घडली, जो नीट हसूही शकत नव्हता. जेव्हा फोटोग्राफने पंतला नीट हसायाल सांगितलं तेव्हा ते त्यान अजब उत्तर दिलं. जे ऐकून सगळेच हसायला सांगितले.
टीम इंडियाच्या (Team India) इतर खेळाडूंप्रमाणे, ऋषभपंत देखील फोटोशूटसाठी आला होता. फोटोग्राफरने त्याचे काही फोटो काढले, पण तो नीट हसत नव्हता, तेव्हा फोटोग्राफरने त्याला जरा आणखी, नीट हसण्यास सांगितलं. तेव्हा पंतने त्याला थेट उत्त दिलं की ,मी नुकताच झोपेतून जागा झालो आहे. पंतचे फोटो काढण्यात येत होते, तेव्हा त्याच्या डोळ्यांत अतिशय झोप दिसत होती. तर दुसरीकडे अर्शदीप सिंग एका वेगळ्याच ऊर्जेत दिसत होता. “जर फोटो बरोबर आला नसेल तर पुन्हा काढा.” असं तो त्याचा फोटो क्लिक झाल्यानंतर म्हणाला. दुसरीकडे, विराट कोहलीने हा अतिशय प्रोफेशनली फोटो काढून घेत होता तर रोहित शर्माने फोटोग्राफरलाच समजावलं की कोणता अँगल आधी घ्यायचा.




