spot_img

Otur : शेतकऱ्याच्या सोयाबीनची चोरी करणारी टोळी गजाआड 

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:दि.२९ नोव्हेंबर ( रमेश तांबे )

शेतकऱ्यांच्या सोयाबीन मालाची चोरी करणारी टोळी पोलिसांनी पकडले असून, या टोळीकडून १ लाख ३७ हजार दोनशे रूपये किमतीचे सोयाबीन हस्तगत करण्यात आले आहे.सदरची कारवाई पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने केली आहे.

१) सागर रमेश जाधव वय २२ वर्षे, २) समीर संतोष भालेकर वय २१ वर्षे, ३) आकाश बाळशीराम काळे वय १९ वर्षे ४) दिपक गौतम काळे वय २६ वर्षे सर्व रा वडाचीवाडी, चास ता. आंबेगाव जि पुणे  अशी सोयाबीनची चोरी केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुदर्शन रामचंद्र मनसूख वय ४१ वर्षे, व्यवसाय शेती रा. एकनाथ वाडी, सावरगाव ता जुन्नर जि पुणे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे सुदर्शन रामचंद्र मनसूख यांच्या शेतामध्ये झाकून ठेवलेले सुमारे एक हजार किलो ग्रॅम वजनाचे सोयाबीन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दि १४ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चोरी केले होते. त्याबाबत मनसूख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविला होता.

शेतकऱ्याने मेहनतीने पिकवलेल्या शेतमालाची चोरी झाल्याने शेतकरी व्यथीत होतात, त्यांचे सर्व कष्ट वाया जातात अशा गोष्टींचा विचार करत पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी शेती माल चोरीचा गुन्हा उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाला आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करून, घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळ हे शेतात असल्याने शेतापासून मुख्य रस्त्याकडे जाणारे सर्व कच्चे रस्ते तपासणेत आले. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरील सी.सी.टी.व्ही. तपासण्यात आले. फुटेज तपासताना दोन मोटार सायकलवरील चार संशयित इसमांची हालचाल संशयित वाटल्याने, त्या मोटार सायकलचा मागोवा घेण्यात आला. दोन्ही मोटार सायकल चास गावाचे दिशेने गेल्याचे निदर्शनास आले. त्या आधारे पथकाने गोपनीय बातमीदारांना मोटार सायकल व त्यावरील संशयिताबाबत माहिती देवून संशयित इसमांची माहिती काढण्यास सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.२५ नोव्हेंबर  घोडेगाव परिसरात गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना,गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, फुटेज मध्ये दिसणाऱ्या मोटार सायकलवरील इसम  सागर जाधव, समीर भालेकर व इतर दोन साथीदार सर्व रा. वडाचीवाडी,चास ता.आंबेगाव जि पुणे हे असून,त्यांनी सदरचा गुन्हा केला आहे, अशी बातमी मिळाली. बातमीचे आधारे आरोपी बाबत माहिती काढून आरोपीं १) सागर जाधव २) समीर भालेकर ३) आकाश काळे  ४) दिपक काळे यांना गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्प्लेंडर मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. आरोपींकडून ४०० किलोग्रॅम वजनाचे सोयाबीन, दोन मोटार सायकल असा एकूण १ लाख ३७ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता, त्यांची दि.२८ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आली होती, आरोपींना मा. न्यायालयाने दि.२९ रोजी न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर केली आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक  संदीप सिंह गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर,स्थानिक.गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक  महोदव शेलार, पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजु मोमीन, संदिप वारे, अक्षय नवले, यांनी केली असून पुढील तपास पोहवा महेश भालेराव हे करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ