आरोपींकडून दुचाकी सह ६३ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
ओतूर,प्रतिनिधी:दि.२८ नोव्हेंबर ( रमेश तांबे )
पुणे जिल्ह्यातील घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. सदरची कारवाई घोडेगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी केली आहे. सुनील उर्फ पोट्या विलास मधे रा.जवळा ता.पारनेर जि. अहिल्यानगर, धनंजय संजू काळे रा.गुणोरे ता.पारनेर जि.अहिल्यानगर अशी आरोपींची नावे आहेत.
सदर आरोपींनी घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत दि.१९ नोव्हेंबर रोजी कोंबिंग ऑपरेशन व रात्रगस्त दरम्यान निर्मनुष्य ठिकाणी तीन संशयित इसम एका विनानंबर प्लेट मोटर सायकलसह आढळून आले होते. त्यावेळी त्यांना पोलीसांची चाहुल लागताच,पळताना एक जण ताब्यात मिळाला व दोघे अंधारामध्ये पळून गेले होते. त्यावेळी ताब्यातील इसम नामे सुनील उर्फ पोटया विलास मधे रा.जवळा ता.पारनेर जि.अहिल्यानगर याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता,तसेच त्याचेकडे मिळुन आलेल्या गाडीची पडताळणी केली असता, त्याने घरफोडी करण्यासाठी आल्याचे कबूल केले. त्यानंतर आरोपीला विश्वासात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने पळून गेलेल्या दोघांच्या सोबत घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत यापूर्वी रात्रीच्या वेळी जबरी चोरी व घरफोडी करून दागिने व रोख रक्कम चोरी केली असल्याची कबुली दिली होती. नमुद इसमाचा पूर्व इतिहास पडताळला असता आरोपीवर शिकापुर पोलीस ठाणे येथे सन २०१६ मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींपैकी आरोपी धनंजय संजू काळे रा.गुणोरे ता.पारनेर जि.अहिल्यानगर याला ताब्यात घेतले होते.
नमुद दोन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक करून तपासात आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले काही दागिने, पैसे व गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल, कटावणी जप्त करण्यात आलेली असून आरोपींकडून एक हजार रूपये रोख रक्कम,लोखंडी पिळयाची कटावणी,३५ हजार रूपयांची हिरो कंपनीची स्प्लेन्डर प्लस,२४०० रोकड,१० हजार रूपये किमतीच्या सोन्याच्या दोन वाट्या,६ हजार रूपये किमतीचे सोन्याचे मोठे १२ मणी,८ हजार ८०० रूपये किमतीचे सोन्याचे २२ मणी असा एकूण ६३ हजार २०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप सिंग गिल,अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि सागर पवार, स्था.गु.शा.चे सपोनि महादेव शेलार, घोडेगाव पोलीस ठाणेचे पोउपनि महेश पवार,पोहवा रवींद्र सुरकुले, भरत केदार, मनिषा तुरे, समीर कांबळे, सरला सुरकुले, जालींदर रहाणे,भाऊ कोरके, पोलीस शिपाई नामदेव डेंगळे,अनिल भोईर, निलेश तळपे,आशुतोष पानसरे,रामदास तनपुरे, अक्षय वायदंडे, राम राठोड स्था.गु.शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार दिपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे,राजु मोमीन,पोलीस शिपाई अक्षय नवले यांचेसह घोडेगाव पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे शाखेचे इतर अधिकारी व अंमलदार यांनी केली असून इतर आरोपीचा शोध व नमुद गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर पवार व पोलीस हवालदार रवींद्र सरकले हे करीत आहेत.




