spot_img

Winter Kidney Health : हिवाळ्यात प्या भरपूर पाणी ! मूतखडा होण्याआधी घ्या ‘अशी’ काळजी

spot_img

हिवाळ्यात पाणी कमी पिणं ठरणार धोक्याचं, मुतखडा होण्यापूर्वी दिसतात ही लक्षणे.

Winter Kidney Health: तापमान कमी होत असताना, बरेच लोक नकळत कमी पाणी पितात, ज्यामुळे निर्जलीकरण होते, जे मूतखडा होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. मूतखडे हे कॅल्शियम, ऑक्सलेट आणि युरिक अॅसिड सारख्या खनिजांपासून बनलेले घन स्फटिक असतात जे मूत्रपिंडात जमा होतात. जेव्हा हे खडे मूत्रमार्गातून जातात तेव्हा प्रचंड वेदना आणि अस्वस्थता निर्माण करू शकतात.

मूत्रपिंडातील खडे होण्यामागची कारणं म्हणजे पाणी कमी पिणे. मीठ, प्रथिनं आणि प्रक्रिया केलेले अन्न जास्त प्रमाणात सेवन केल्याने मूत्रपिंडात खडे तयार होतात. कोरडी हवा आणि घामाचे प्रमाण कमी झाल्याने तहान देखील कमी लागते. ज्या लोकांना मूतखड्याचा इतिहास आहे किंवा लठ्ठपणा, मधुमेह किंवा संधिविकार यासारख्या आजारांचा वैद्यकिय इतिहास आहे त्यांना किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक असतो.हिवाळ्यात (Winter) होणाऱ्या निर्जलीकरणामुळे मूतखड्याची शक्यता वाढते. मूतखड्याची (Kidney stones) कारणे समजून घेतल्यास आणि योग्य जीवनशैलीचे पालन केल्यास थंडीतही तुमच्या मूत्रपिंडांचे रक्षण होऊ शकते. प्रत्येकाने आपल्या मूत्रपिंडाच्या आरोग्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.

पाठीच्या खालच्या भागात किंवा ओटीपोटात तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ होणे, मळमळ किंवा उलट्या होणे, फेसाळ किंवा लालसर लघवी होणे तसेच वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे ही लक्षणे दिसून येतात. वेळीच उपचार न केल्यास मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान होते किंवा संसर्ग होतो. किडनी स्टोनवर तज्ञांकडून त्वरित व्यवस्थापन करणे गरजेचे राहील.

तहान लागली नसली तरीही दररोज 10 ते 12 ग्लास पाणी प्या. कोमट पाणी किंवा हर्बल टी, जसे की पुदीना, कॅमोमाइल किंवा हिबिस्कस असे पर्याय निवडा. जास्त सोडियममुळे लघवीमध्ये कॅल्शियम जमा होते. म्हणून, प्रक्रिया केलेल्या पदार्थाचे सेवन टाळा. लिंबू आणि संत्री सारख्या लिंबूवर्गीय फळांचा समावेश असलेला पौष्टिक आहार घ्या, जे मूतखड्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करा. व्यायामामुळे चयापचय प्रक्रिया सुधारते आणि मूत्रपिंडांचे कार्य चांगले राहण्यास मदत होते. लघवीच्या रंगातील बदलांचे निरीक्षण करा आणि कोणतीही असामान्यता आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला वेदना, जळजळ किंवा लघवीवाटे रक्त येत असेल तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ