spot_img

Palash Muchhal Health Update : स्ट्रेसमुळे प्रकृती बिघडली; डॉक्टरांनी दिलं पलाश मुच्छलबद्दल हेल्थ अपडेट

spot_img

पलाशला लवकरच मिळणार डिस्चार्ज.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगली होती. 23 नोव्हेंबरला दोघांनी सात फेरे घेण्याची तयारीही पूर्ण केली होती. पण लग्नाच्या आदल्या रात्रीच स्मृतीच्या वडिलांची अचानक तब्येत खालावल्याने संपूर्ण सोहळा पुढे ढकलावा लागला. याच दरम्यान सोशल मीडियावर पलाशच्या नावानं काही फ्लर्टी चॅट्स व्हायरल होताच, त्यांच्या नात्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिल्याची चर्चा सुरू झाली.

अशातच नवी बातमी समोर आली—स्मृतीचे वडील रुग्णालयात असतानाच पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली. अचानक छातीत दुखू लागल्यानं त्याला प्रथम सांगली येथे आणि नंतर मुंबईतील SRV रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी ECG, 2D इकोकार्डियोग्राफीसह सर्व तपासण्या केल्या; मात्र हृदयविकारासारखी कोणतीही गंभीर समस्या आढळली नाही. डॉक्टर दीपेंद्र त्रिपाठी यांच्या माहितीनुसार, पलाशला आलेला त्रास हा स्ट्रेसमुळे निर्माण झालेला होता.

रुग्णालयात प्राथमिक उपचारांसोबत ऑक्सिजन थेरपी देण्यात आली. त्यानंतर त्याची प्रकृती स्थिर झाल्यावर त्याला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला आहे. लवकरच डिस्चार्ज मिळेल, अशी माहितीही समोर आली आहे. दरम्यान, पलाशचे व्हायरल झालेले चॅट्स आणि त्याच्या आधीच्या रिलेशनशिप्सबद्दल पुन्हा चर्चा रंगू लागली आहेत. अनेकांनी त्याच्यावर टीका केली असून काहींनी स्मृतीच्या बाजूने सहानुभूती व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर मात्र या संपूर्ण प्रकरणाबद्दल विविध मते समोर येत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ