spot_img

Champashashti festival : साताऱ्यात भंडाऱ्याची उधळण करत चंपाषष्ठी उत्सव साजरा !

spot_img

यळकोट-यळकोट जय मल्हारच्या गजरात आज चंपाषष्ठी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आ

यळकोट-यळकोट जय मल्हारच्या गजरात आज चंपाषष्ठी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. चंपाषष्ठीच्या (Champashashti) निमित्ताने आज सकाळी येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भंडारा, रेवड्यांची उधळण करत भाविकांनी मोठ्या संख्येने खंडोबा मंदिरात दर्शन घेतले. यावेळी जय मल्हारच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमला .

देव मार्तंड देव मल्हारी, तूच कुलदैवत माझा खंडोबा…!, जय मल्हारच्या गजरात मोठ्या उत्साहात मंदिरात चंपाषष्ठी साजरी केली जाते. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. सातारा मंदिराला तर अनेक वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. सकाळी आरती झाल्यानंतर पालखी पूजन करून सातारा खंडोबा मंदिरातून (Satara Khandoba Temple) पालखी काढण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. वाघ्या मुरळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 50 ते 60 वाघ्या मुरळीने हजेरी लावली. यावेळी भाविकांनी बाजरीची भाकर वांग्याचे भरीत यांचा नैवेद्य दाखवण्यात आला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ