spot_img

Haryana Sports News : हरियाणात बास्केटबॉलपटू खेळाडूंच्या दुर्दैवी मृत्यूनंतर संतापाची लाट !

spot_img

हरियाणाचे क्रीडामंत्री गौरव गौतम यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

हरियाणात (Haryana) बास्केटबॉल सरावादरम्यान दोन वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. एक घटना बहादूरगड आणि दुसरी घटना रोहतकमध्ये घडली. या घटनेमुळे राज्यातील क्रीडा मैदानं आणि खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मृत्यूच्या घटनेनंतर क्रीडाविश्वात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सरकारही खडबडून जागं झालं आहे. या घटनेची दखल हरियाणाचे क्रीडामंत्री (Sports Minister) गौरव गौतम यांनी घेतली आहे. या प्रकरणात जिल्हा खेळ अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच घटना घडलेल्या ठिकाणीतील संपूर्ण नर्सरी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. इतकंच काय तर या घटनांची उत्तस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर कारवाईचंही त्यांनी आश्वासन दिलं आहे.

या घटनेनंतर राज्याचं राजकारण तापलं आहे. काँग्रेस नेत्या विनेश फोगट यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विनेश फोगाट यांनी सांगितलं की, “सत्य हे आहे की हरियाणातील मुले मैदानात आपले प्राण गमावत आहेत आणि भाजप सरकार कागदावर आणि जाहिरातींमध्ये ‘विकास’ शोधत आहे. हे व्यवस्थेचे अपयश नाही, तर व्यवस्थेची हत्या आहे. आणि त्यासोबतच, मुलांची स्वप्ने, त्यांचा विश्वास आणि त्यांचे भविष्य मारले जात आहे. हे क्रीडा धोरण नाही, तर खेळाडूंच्या स्वप्नांची ही उघड हत्या आहे.”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ