spot_img

Smriti Mandhana Wedding : स्मृतीच्या लग्नाची तयारी सुरू असताना पोलिसांसोबत डॉग स्क्वॉड पथक आल्याने घाबरले पाहुणे

spot_img

23 तारखेला पार पडणार स्मृती मानधनाचा शाही विवाह सोहळा.

भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधनाचा (Smriti Mandhana) 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत विवाह सोहळा पार पडतोय.या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी मानधना कुटुंबाकडून करण्यात आलेली आहे.आणि लग्नसोहळ्यासाठी नवरदेव असणारे पलाश मूछल हे वऱ्हाड मंडळीसह सांगलीत दाखल झालेत. मानधना परिवाराकडून त्यांचं जंगी स्वागत देखील करण्यात आले आहे, धुमधडाक्यात होणाऱ्या या लग्न सोहळ्यासाठी क्रिकेट क्षेत्रासह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थिती लावत आहे.

सांगलीतील (Sangli) कवठेपिरांन रोड येथील मानधना फार्म हाऊसमध्ये काल रात्री हळदीचा समारंभ संपन्न झाला. आज मेहंदीचा आणि संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी फार्महाऊसवर सांगली पोलीस दलाच्या वतीने बॉम्ब शोधक डॉग स्कॉड पथक दाखल झाला आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर या शाही विवाह सोहळ्यासाठी येणार असल्यामुळे या डॉग्सच्या माध्यमातून विवाह स्थळाची संपूर्ण तपासणी आणि पाहणी करण्यात येत आहे. पण अचानक पोलीस आणि डॉग स्कॉड आल्यामुळे सर्वजण सुरुवातीला घाबरले. नंतर केवळ तपासाचा भाग असल्यामुळे पुन्हा सर्वजण आनंदाने मजामस्ती करु लागले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ