spot_img

Mhada home Lottery : मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी! वरळीत म्हाडाचे 58 व 85 मजली आलिशान टॉवर्स

spot_img

सिडकोकडूनही प्रथमच ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ पद्धतीने 4,508 घरे; धारावी पुनर्विकासाची गती वाढली

जमिनीला अक्षरशः सोन्याचा भाव असलेल्या मुंबईत स्वतःचे घर असावे, हे अनेकांचे आजीवन स्वप्न. अशा सर्वसामान्य मुंबईकरांना स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देणारी म्हाडा आता दक्षिण मुंबईच्या वरळीत मोठी संधी आणत आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या जागेवर म्हाडा 58 आणि 85 मजली असे दोन अतिउंच टॉवर्स उभारणार असून, या घरांचे वाटप लॉटरीद्वारे करण्यात येणार आहे.

या इमारतींमध्ये आधुनिक व आलिशान सुविधा देण्याचा म्हाडाचा विचार आहे. पुनर्वसनासाठी उभारल्या जाणाऱ्या इमारतींसह म्हाडाला मिळालेल्या स्वतंत्र जमिनीवर हे टॉवर्स विकसित केले जाणार असून विमानतळ प्राधिकरणाची परवानगीही मिळाल्याने प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय याच प्रकल्पात म्हाडा आणखी तीन स्वतंत्र विक्री टॉवर्स उभारणार आहे.

दरम्यान, नवी मुंबईत सिडकोने पहिल्यांदाच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या मॉडेलवर 4,508 घरांची मोठी योजना जाहीर केली आहे. तळोजा, घणसोली, कळंबोली, खारघर आणि द्रोणागिरी या विस्तारत जाणाऱ्या परिसरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (PMAY) EWS आणि LIG वर्गाला ही घरे मिळणार असून 22 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. घराची पसंती निवडण्याची मुभा अर्जदारांना मिळणार असल्याने ही योजना अधिक आकर्षक ठरणार आहे.

मुंबईतील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प मानल्या जाणाऱ्या धारावीतील सर्वेक्षण प्रक्रियेलाही वेग आला आहे. 18 हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून घरांना क्रमांक देणे, कागदपत्रांची पडताळणी आणि प्रत्यक्ष भेटींच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांची नोंदणी जलद गतीने सुरू आहे. या प्रक्रियेचा फायदा मोठ्या संख्येने रहिवाशांना मिळणार आहे. एका बाजूला वरळीत पंचतारांकित सुविधा असलेले घरे आणि दुसऱ्या बाजूला नवी मुंबई व धारावीतील गृहनिर्माण प्रकल्पांना मिळालेला वेग त्यामुळे मुंबईतील घरांच्या स्वप्नाला आता नवी आशा मिळाली आहे!

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ