spot_img

Mumbai Railway Mega block : हार्बर मार्गावर आज मध्यरात्रीपासून 12 तासांचा ब्लॉक

spot_img

पनवेलकडे जाणाऱ्या लोकल सेवा होणार विस्कळीत प्रवाशांनी आधीच पर्यायी मार्ग ठरवावा

मुंबईकरांना रोज त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचवणारी लोकल रेल्वे सेवा कधी कधी दुरुस्ती आणि देखभालीसाठी थांबवावी लागतेच. त्याचाच एक भाग म्हणून हार्बर मार्गावरील पनवेल स्टेशन परिसरात विविध अभियांत्रिकी कामांसाठी शनिवारी रात्री मोठा 12 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

हा ब्लॉक शनिवार रात्री 11:45 ते रविवार सकाळी 11:45 या कालावधीत राहणार असून बेलापूर–पनवेल दरम्यानची लोकल सेवा पूर्णतः बंद राहील. तसेच वाशी, नेरूळमधून पनवेलकडे जाणाऱ्या लोकल्सही रद्द राहणार आहेत.

याशिवाय सीएसएमटी–पनवेल आणि सीएसएमटी–वडाळा मार्गावरील काही लोकल्स रविवारी सकाळी बंद राहतील. त्यामुळे या काळात प्रवास करणाऱ्यांनी आपली योजना बदलावी किंवा पर्यायी मार्गाचा विचार करावा, असे आवाहन मध्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्या लोकल्सवर परिणाम?

शनिवार रात्री

रात्री 10:50 ची सीएसएमटी–पनवेल लोकल → बेलापूरपर्यंतच

रात्री 10:55 ची ठाणे–पनवेल लोकल रद्द

रविवार सकाळ

9:28 व 11:28 च्या पनवेल–सीएसएमटी लोकल्स वाशीहून सुरू

11:52 ची पनवेल–सीएसएमटी लोकल बेलापूरहून

खालील लोकल्स रद्द

ठाणे–पनवेल: 8:41, 10:01

ठाणे–नेरूळ: 9:04, 11:42

ठाणे–वाशी: 10:20

पनवेल–ठाणे: 7:43, 8:04, 9:01, 10:41, 11:02

बदलापूर मार्गावरही रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवरील बदलापूर स्टेशनजवळ उड्डाणपुलाच्या कामासाठी 12 दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक घेतला जात आहे.
या ब्लॉकमुळे:

सीएसएमटी–कर्जत रात्री 12:12ची लोकल → अबंबरनाथपर्यंत

कर्जत–सीएसएमटी रात्री 2:30ची लोकल → अंबरनाथहून सुटणार

हा ब्लॉक 3 डिसेंबरपर्यंत राहणार असून कर्जत, भिवपुरी, नेरूळ, शेलू, वांगणी आणि बदलापूर प्रवाशांना अडचण येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ